मन असच वेड असतं
कितीही समजावलं तरी
स्वप्ना माघे धावत राहत
काहीच काळात नाही त्याला
सावल्यांना धरत राहत
खरच मन किती वेड असतं
सुखाचा शोध घेत घेत
अनेक दुख झेलत राहत
खर्या प्रेमाची वाट बघत
काट्यानवरती चालत राहत
खरच मन किती वेड असतं
जीवनाची खोटी आशा बाळगत
शरीराला जपत राहतो
मृत्यूचाही उत्सव करून
माणसाला जागवत राहत
खरच मन किती वेड असतं